
अमळनेर : भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी याकरीता संविधान दिनाचे महत्व लक्षात घेऊन राज्यात दरवर्षी ता.२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नागरीकांना स्वातंत्र्य, समता व बंधुतेचा हक्क प्रदान करणारी भारतीय राज्यघटना आहे. त्या निमित्ताने अमळनेर नगरपालिका, विविध शाळा, महाविद्यालयांत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
अमळनेर नगरपालिकेतही संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, नगरसेवक व कर्मचारी बांधव उपस्थित होते.
प्रताप महाविद्यालय, अमळनेर

संविधान दिनाचे महत्व लक्षात घेऊन प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्ष म्हणुन प्राचार्य डॉ. ज्योती राणे होत्या. खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व उद्देशिका पोस्टर चे अनावरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. राणे यांनी संविधानाच्या संदर्भ ग्रंथाचे पुजन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहिद सना आलम मुल्ला व २६/११ चे शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. प्रा. जितेन्द्र संदानशिव यांनी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी उप प्राचार्य प्रा. सौ एल. ए. पाटील, प्रा. पी.आर. भुतडा, प्रा.उल्हास मोरे, डॉ. हर्षवर्धन जाधव, प्रा. पारधी, प्रा.दिपक पाटील, प्रा.गुलाले, प्रा. बापू संदानशिव, प्राा. वसंत पाटील,प्रा देवेन्द्र वानखेडे,प्रा.सी.आर. पाटील, प्रा. एम. एन. संदानशिव, प्रा. विलास पाटील, प्रा. प्रशाांंत ठाकुर दयांचेसह असंख्य प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचेे सूत्रसंचालन व आभार डॉ. विजय तुन्टे यांनी केले.
सरस्वती विद्या मंदिर, अमळनेर

सरस्वती विद्या मंदिर,अमळनेर येथे सामुहिकपणे संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन विद्यार्थ्यानी केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भारतीय संविधानाची प्रत पाहण्यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आली होती. बालकांनी कुतुहलाने भारतीय संविधान न्याहाळले. शाळेचे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या यशस्वी लोकशाही देशाचे सर्वात मोठं भारतीय संविधान असल्याचा अभिमान सर्वांनी बाळगावा. संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी असेही आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषीकेश महाळपूरकर यांनी केले. सूत्रसंचालन धर्मा धनगर यांनी तर परशुराम गांगुर्डे यांनी आभार मानले. या वेळी उपशिक्षिका संगीता पाटील, गीतांजली पाटील, आनंदा पाटील, संध्या ढबू आदी शिक्षक उपस्थित होते.
मुलींचे शासकीय वसतिगृह, अमळनेर

मुलींचे शासकीय वसतिगृह, अमळनेर येथे संविधान वाचन झाले. प्रभारी वसतिगृह प्रमुख मंगला पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. पाटील यांनी संविधानाबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी वसतिगृहाचे कर्मचारी रोहिणी ठाकूर, ज्योती मिस्तरी, ज्योती पवार, ज्योती बिऱ्हाडे, संगीता चौधरी यांचेसह वसतिगृह मधील विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
के. डी. गायकवाड विद्यालय, अमळनेर

के. डी. गायकवाड माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथे मुख्याध्यापक ए. व्ही. नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येेेेवून संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन पी. एम. चौधरी यांनी केले. सौ. पी.आर. पारधी यांनी संविधानाबद्दल सविस्तर माहिती दिली. संविधानावर आधारित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी संविधान दिनाच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमात मुख्याध्यापक ए. व्ही. नेतकर,पर्यवेक्षक एस. सी. तेले, सरचिटणीस डी. डी. पाटील, बिऱ्हाडे भाऊसाहेब, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आर. आर. ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन सौ. जे. एस. पाटील यांनी केले.