
अमळनेर : पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी शहरातून रूट मार्च काढण्यात आला. यात पोलीसांचा ताफा सहभागी झाला होता. या रूट मार्चने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तर गुन्हेगारी प्रवृत्तींनी धसका घेतला.
अमळनेर शहरात पोलीस स्टेशन हद्दीत संमिश्र वस्तीत पोलीस रूट मार्च घेण्यात आला. त्यात १२ अधिकारी, १८४ कर्मचारी उपस्थित होते. प्रामुख्याने पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, एपीआय सदगीर, ढोबळे, पोलीस उपनिरीक्षक माळी, गोपनीय अंमलदार शरद पाटील, दीपक माळी, रवी पाटील, भूषण बाविस्कर, मिलिंद भामरे, ईश्वर सोनवणे तसेच रॅपिड ऍक्शन फोर्सचे ८ अधिकारी, ६३ कर्मचारी, आरसीपीचे ३२, सीआर स्टर्किंग फोर्सचे ३२, होमगार्ड १२ व पोलीस स्टेशनचे ३५ असे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.