पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयास समई भेट

ज्ञानाचा दिवा अखंड तेवत राहण्यासाठी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांचे दातृत्व

अमळनेर : ग्रंथालयातून ज्ञानाचा दिवा अखंड तेवत राहून ग्रंथांनी वाचकांचे जीवन उजळून जावे, यासाठी अमळनेर येथील पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला चिटणीस प्रकाश वाघ यांनी समई भेट दिली.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्षा डॉ. माधुरी भांडारकर, सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, साहित्यिक रमेश पवार, ॲड. तिलोत्तमा पाटील, नगीनचंद लोढा, अनिल घासकडवी यांनी भेट दिलेली समई स्विकारली. वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी वाघ यांचे आभार व्यक्त करतांना सांगितले की, त्यांची परोपकारी वृत्ती वाखाणण्याजोगी असून त्यांचे नेहमीच वाचनालयाच्या कामासाठी सहकार्य होत असते.
यावेळी सह चिटणीस सुमित धाडकर, विश्वस्त बापू नगांवकर, सदस्य भीमराव जाधव, पी.एन,भादलीकर, नीलेश पाटील, ईश्वर महाजन, ॲड. रामकृष्ण उपासनी, प्रसाद जोशी, दिपक वाल्हे, ज्योतिर्मयी सोनवणे, साहित्यिक अरविंद सोनटक्के, पत्रकार उमेश काटे व सानेगुरुजी वाचनालयाचे कर्मचारी सीमा धाडकर, सुरेश जोशी, रमेश सोनार, मधुकर बाळापुरे उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!