एड्स सप्ताह निमित्त रोटरी क्लब,अमळनेर तर्फे एड्स बाधितांना पोषण आहाराचे वाटप

अमळनेर : येथील ग्रामीण रूग्णालयात एड्स बाधितांना योग्य पोषण आहार मिळावा या हेतूने रोटरी क्लब, अमळनेर तर्फे प्रत्येक एड्स बाधितास सहा प्रकारचे कडधान्य व मास्क वाटप नुकतेच करण्यात आले.

एड्स सप्ताह निमित्त काल (ता.३) अमळनेर ग्रामीण रूग्णालयातील आय.सी.टी.सी. व ए.आर.टी. सेन्टर येथे एड्स बाधितांना कडधान्य व मास्क वाटप करण्यात आले. यात अमळनेर रोटरी क्लब, आधार बहूद्देशिय संस्था, ग्रामीण रूग्णालयातील डाॅ.प्रकाश ताळे व समुपदेशक अश्वमेघ पाटील, देवेंद्र मोरे व सेन्टरचे कर्मचारी वृंद यांनी सहभाग घेवून सहकार्य केले. यावेळी प्रोजेक्ट चेअरमन रो.डाॅ.शरद बाविस्कर, रो.डाॅ.राहुल मुठे, प्रेसिडेंट रो.पुनम कोचर, सेक्रेटरी रो.वृषभ पारेख,  रो.विनोद जैन, रो.चेलाराम सैनानी, रो. दिनेश रेजा, रो.अभिजित भांडारकर, रो.देवांग शहा, रो. प्रदिप पारख, रो.रोहीत सिंघवी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!