सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आज ‘साहित्यिक गप्पा’ कार्यक्रमाचे आयोजन

सुप्रसिद्ध लेखक डॉ.प्रशांत बागडे उपस्थित राहणार.

अमळनेर : शहर व परिसरातील साहित्य रसिकांना साहित्य व वाड्मय विषयक भूमिका याविषयी दिलखुलास संवाद साधता यावा यासाठी सानेगुरुजी ग्रंथालय व  मोफत वाचनालयात आज ता.११ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘साहित्यिक गप्पा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, शिव बहुउद्देशीय प्रतिष्ठान – अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास विवादे -विषादे -प्रमादे -प्रवासे या कथा संग्रहासाठी बाबुराव बागुल शब्द पुरस्कार तसेच पु.ना.पंडीत साहित्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लेखक डॉ.प्रशांत बागडे उपस्थित राहणार आहेत. लेखक आय.आय.टी, कानपूर या नामांकीत शिक्षण संस्थेत तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक असून त्यांनी आपल्या सृजनात्मक लेखनातून वेळोवेळी साहित्यविषयक भूमिका मांडली आहे. साहित्यप्रेमी व वाचनप्रेमींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्षा डॉ. माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ, सहचिटणीस सुमित धाडकर, विश्वस्त बापू नगांवकर व सर्व संचालक मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष रमेश पवार, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, शिव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित शिंदे , सेक्रेटरी प्रा.लिलाधर पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!