श्रीमंत प्रतापशेठ यांची १४० वी जयंती साजरी

अमळनेर : येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात दानशुर व्यक्तिमत्व, शिक्षण, उद्योग, सेवा व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणारे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४० वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ.एस.आर.चौधरी व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

तत्वज्ञान विषयाचे अभ्यासक व चिंतक असलेले प्रतापशेठ यांनी तत्वज्ञान केंद्राची स्थापना केली. अनेक अभ्यासक शेठजींच्या दातृत्वामुळे या केंद्रात अभ्यासासाठी येऊन गेले. त्याचप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व अध्यात्मिक असे वेगवेगळे अजरामर कार्य प्रतापशेठ यांनी केले. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. याप्रसंगी सिनेट सदस्य दिनेश नाईक, प्रा.धर्मसिंह पाटील, प्रा.डॉ.धिरज वैष्णव, प्रा.डॉ.राधिका पाठक, प्रा.प्रमोद चौधरी, पंडीत नाईक, रंजना फालक, युनूस पठाण, गोपाल माळी, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

प्रताप महाविद्यालयाच्या प्रवेशद्वार जवळील शेठजींच्या पुतळ्याचेही पूजन

प्रताप महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील शेठजींच्या पुतळ्याचेही पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अनील कदम यांनी शेठजींच्या पुतळ्याचेही पूजन करून माल्यार्पण केले. संस्थेच्या समन्वय समितीचे अध्यक्ष हरी भिका वाणी यांनी शेठजींच्या पत्नीच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कमल कोचर, कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक जितेंद्र जैन, प्राचार्या डॉ. ज्योती राणे, प्राध्यापक प्रतिनिधी पी.आर.भुतडा, मुख्याध्यापक प्रतिनिधी पी.बी. पाटील, शिक्षक प्रतिनिधी डिगंबर महाले , रजिस्ट्रार राकेश निळे, कार्यालयीन लिपिक भटू चौधरी यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!