जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर

अमळनेरचे सभापती पद सर्वसाधारण (महिला) साठी राखीव

जळगाव : जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (महसूल) रविन्द्र भारदे, जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.            

आरक्षण लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठया काढून जाहीर करण्यात आले. पंचायत समितीनिहाय आरक्षणात बोदवड- अनुसूचित जाती (एससी), जामनेर- अनुसूचित जमाती (एसटी), पाचोरा- अनुसूचित जमाती (एसटी) महिलासाठी राखीव, पारोळा- अनुसूचित जमाती (एसटी) महिलासाठी राखीव, जळगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, चाळीसगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, यावल- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), भडगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, भुसावळ- सर्वसाधारण (महिला), चोपडा- सर्वसाधारण (महिला), अमळनेर- सर्वसाधारण (महिला), एरंडोल- सर्वसाधारण (महिला), रावेर- सर्वसाधारण, धरणगाव- सर्वसाधारण, मुक्ताईनगर- सर्वसाधारण याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण १५ पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी सोडत काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. यात, अनुसूचित जाती (एससी)-०१, अनुसूचित जमाती (एसटी)-०३ पैकी ०२ महिलांसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्ग-०४ पैकी महिलांसाठी ०२, सर्वसाधारणसाठी ०७ पैकी महिलांसाठी ०४ याप्रमाणे आरक्षित झाले आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!