
अमळनेर : संत गजानन महाराज संस्थान, मुंदडानगर येथील संत गजानन महाराजांची महिला वारी शुक्रवारी सकाळी शेगावकडे रवाना झाली. यावेळी महिलांनी संत गजानन महाराज यांचा जयघोष केला. ही वारी ठिकठिकाणी विश्रांती घेत २१ डिसेंबर रोजी शेगावला पोहोचेल. सकाळी गजानन महाराज मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर वारीत चालतांना एका बाजूस चालावे व शिस्तीचे पालन करावे अशा सूचना देत वारीबाबत मार्गदर्शन करण्यात येवून मंदिरापासून महिलांची वारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाजत-गाजत शेगांवला रवाना झाली. यावेळी अनेकांनी पालखीचे दर्शन घेतले.
गजानन भक्त ज्योती पवार, उर्मिला जगताप, तेजस्विनी बोरसे, सरला चव्हाण, हिना पाटील, पूजा पाटील, प्रियंका पाटील, अंकीता पाटील, बबिता पाटील, शोभा कोळी, वंदना भारती, छाया शिंगाने, संगीता पाटील, शितल पाटील, सेवाधारी खंडू पाटील, परेश पाटील, अनिल पाटील, मोहित पवार, जगदीश साठे, सुनील पाटील व संत गजानन महाराज सेवा संस्थाचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार तसेेच मुंदडानगर, सुरभी कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, पाटील कॉलनी, मारवड, अमळगाव, पिंगळवाडे, सडावण येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.