जुनी पेन्शन संघर्ष समितीतर्फे आमदार अनिल पाटील यांना निवेदन

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना मिळण्याची मागणी


अमळनेर : १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्ती असलेेेलेे पण टप्प्या टप्प्याने अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी अमळनेर तालुक्यातील जुनी पेन्शन संघर्ष समितीतर्फे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना नुकतेच निवेदन देेेेेवून सविस्तर चर्चा केली. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेले पण टप्प्या टप्प्याने अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी. राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची २००५ पूर्वी नियुक्त असल्याने जुनी पेन्शन हा त्यांचा हक्क आहे. टप्प्याटप्प्याने अनुदान देणे शासनाचे धोरण होते. त्यामुळे शासनाने न्याय दयावा. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी साठी सेवा ग्राह्य धरली जाते त्यांना विना अनुदानित शाळेपासून नियमित वेतनश्रेणी मिळते मग जुनी पेन्शन योजना का नको ? याबाबत महाराष्ट्रभर जुन्या पेन्शन संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन मंजूर करताना त्या दिवशी शाळा अनुदानावर आहे की नाही हे न पाहता नियुक्तीची तारीख विचारात घ्यावी व १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी असे म्हटले आहेे.

यावेळी अमळनेर जुनी पेंशन संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभुदास पाटील, मंगरूळ हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, जुनी पेन्शन संघर्ष समितीचे प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, शिक्षक भरतीचे कार्याध्यक्ष आर.जे.पाटील, हरी माळी, राहुल  पाटील, देवळी हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, मिलींद पाटील, महेश पाटील, प्रविण पाटील, दिनेश पाटील, संदीप गोसावी, के.एस.पवार, राजेंद्र पाटील, मुकेश पाटील, दिपक महाजन, किशोर पाटील, राजेंद्र पाटील, दिपक वाघ, स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!