शिवक्षेत्र खवशी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

वै.प.पू. ह.भ.प. विठ्ठल चौधरी उर्फ मोठे बाबा यांच्या ९ व्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथे सालाबादाप्रमाणे प. पू. मोठेबाबा यांच्या कृपा-आशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विठ्ठल मंदिराचे प्रांगणात ता.११ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१९ या काळात दररोज कार्यक्रम सुरु आहेत. सप्ताहभर दररोज सकाळी ५ ते ६ काकड आरती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ तेे ११ हरि किर्तन याप्रमाणे कार्यक्रम होत आहेत. समस्त नागरिक, भाविक, सेवेकरी मोठ्या संख्येने किर्तनाचा लाभ घेत आहेत. कार्यक्रम यशस्वितेसाठी पंचक्रोशीतील नांद्री, पातोंडा, अमळगाव, खेडी, जळोद, पिंपळी, गांधली, पिळोदा, रोटवद, सावखेडा, दापोरी आदी ठिकाणचे भाविक व भजनी मंडळाचेही सहकार्य लाभत आहे. ता.११ रोजी ह.भ.प. योगेश महाराज- वाघाडी, ता.१२ रोजी ह.भ.प. कैलास महाराज- चोपडाई, ता.१३ रोजी ह.भ.प. दिनेश महाराज- कंचनपूर, ता.१४ रोजी ह.भ.प. उल्केश महाराज- पातोंडा (४०गाव) याप्रमाणे किर्तनाचे कार्यक्रम पार पडले.

रविवार, ता.१५ रोजी वै. प.पू. विठ्ठल चौधरी उर्फ मोठे बाबा यांच्या ९ व्या स्मृती दिनानिमित्त ह.भ.प. भालचंद्र महाराज व ह.भ.प. गणेश महाराज यांनी मोठेबाबांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. उपस्थितांनीही मोठेबाबांना श्रद्धांजली अर्पण केली. रविवारी पाचव्या दिवशी युवा किर्तनकार ह.भ.प. भालचंद्र महाराज- खवशी यांचे किर्तनाचा कार्यक्रम झाला. ता.१६ रोजी ह.भ.प. मच्छिंद्र महाराज- वाडीभोकर, ता.१७ रोजी ह.भ.प. प्रकाश महाराज- गोंडगाव यांचे किर्तनाचा कार्यक्रम होईल. ता.१८ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळात ह.भ.प. महंत संजीवदास महाराज- सावखेडा (पाचोरा) यांचे काल्याचे किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होवून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल. प्रवीण गोरख सूर्यवंशी हे महाप्रसादाचे मानकरी असून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्थान, शिवशक्ती देवस्थान व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.



Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!