
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवाशी कोकिळाबाई विठ्ठल भदाणे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांचे पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त कृषी अधिकारी विठ्ठलराव भदाणे यांच्या त्या धर्मपत्नी, ज्ञानेश्वर भदाणे व मारोती भदाणे यांच्या मातोश्री, तर आर्मी स्कुलचे सुभेदार मेजर नागराज पाटील यांच्या त्या सासू होत.