
अमळनेर : जलसाक्षरता केंद्र व यशदा, पुणेच्या वतीने पाण्याचे अंदाजपत्रक,भविष्याचा वेध घेऊन पाण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीच्या उपाययोजना, जैवविविधता यावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन गुरुवार, ता.१९ रोजी दुपारी २ ते ५.३० या वेळेत जिल्हा नियोजन भुवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे करण्यात आले आहे.
कार्यशाळेस यशदा जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक मा. डॉ. सुमंत पांडे, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो) प्रसाद मते, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कार्यकारी अभियंता (जलसंपदा) शिंदे, यावलचे उपवनसंरक्षक प्रकाश मोराणकर, जळगावचे उपवनसंरक्षक दिगंबर पगारे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, जलयोद्धा शिवाजीराव भोईटे, जलजागृती चळवळीचे जीवराज आमले, आर्ट ऑफ लिव्हिंग चे सुधाकर टोके, नॅचरल फार्मिंग च्या डॉ. रंजना बोरसे आदी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेस जलप्रेमी, जलदुत, जलसेवक,जलकर्मी तसेच पाणी, पर्यावरण व जैवविविधता क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती, विद्यार्थी व पर्यावरण प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सागर धनाड, संजय बडगुजर, महेश कुळकर्णी, सुनील वाणी, आर.एस.महाजन, भूषण लाडवंजारी, प्रमोद पुराणिक, नितीन नेरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय जैव विविधता व्यवस्थापन समिती जळगाव व जलदूत, जल साक्षरता केंद्र, यशदा पुणेचे सदस्य तथा प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील यांचेशी ९२७३५३७४३२ वर संपर्क साधावा.