
अमळनेर : येथील रोटरी क्लब व कस्तुरबा हॉस्पीटल यांचे संयुक्त विद्यमाने बालरोग चिकीत्सक डॉ.शरद बाविस्कर निर्मित ‘प्रतिबिंब’ हे दोनदिवशीय चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तारीख २१ व २२ डिसेंबर २०१९ रोजी पी.बी.ए इंग्लिश स्कूल मधील रोटरी हॉलमध्ये प्रदर्शन असणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटक सौ. कस्तुराबाई व शंकरराव वनाजी बाविस्कर असणार आहेत. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहणार असून कलाप्रेमींनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.