समारंभानिमित्त सप्ताहभर दिनांक १९ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९ या काळात वैचारिक मेजवानी

अमळनेर : तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, वाड्मयीन, राजकीय वैभवाची साक्ष म्हणजेच लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सभागृह अर्थातच अमळनेरचा जुना टाऊन हॉल. शहराच्या मध्यवर्ती भागात तत्कालीन समाज सेवकांच्या योगदानातून १९३३ मध्ये टाऊन हॉलची उभारणी करण्यात आली. अमळनेरच्या सामाजिक, सांस्कृतिक, वाड्मयीन, राजकीय वाटचालीत या वास्तूचे मोठे योगदान आहे. या संस्थेचे कालांतराने १९८२ मध्ये ‘लोकमान्य टिळक स्मारक समिती’ असे नामकरण करण्यात आले. या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त सप्ताहभर दिनांक १९ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९ या काळात व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे.
ता.१९ डिसेंबर रोजी संगमनेर येथील ंसेवानिवृत्त प्रा.डॉ अलीम वकील हे ‘भगवतगीतेतील व्यक्तीची इच्छा व ईश्वरीय इच्छा’ या विषयावर बोलणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परीषद सदस्य राजेश पांडे, लोकमान्य शिक्षण मंडळाचे संचालक प्रा.रमेश बहुगुणे असतील. ता.२० डिसेंबर रोजी नोबेल फाउंडेशन, जळगांवचे अध्यक्ष जयदीप पाटील हे ‘चला ! जगणं समुद्ध करू या…’ विषयावर बोलणार आहेत. प्रमुख अतिथी स्त्री रोग तज्ञ डॉ.अपर्णा मुठे, बालरोग तज्ञ डॉ. नितीन पाटील असतील. ता.२१ डिसेंबर संजय चौधरी नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. यात, मानसी चिटणीस- पुणे, राजेंद्र उगले- नाशिक, प्रिया धारुरकर- औरंगाबाद, प्रशांत असनारे- अकोला, कृपेश महाजन- पाचोरा,भास्कर अमृत सागर- धुळे यांचा सहभाग असेल. प्रमुख अतिथी डॉ.संदीप जोशी, डॉ. रवींद्र जैन हे असतील. ता.२२ डिसेंबर रोजी सातारा येथील प्रसिद्ध विचारवंत व लेखक प्रा.प्रसाद चाफेकर हे ‘स्वराज्य पुरस्कर्ते लोकमान्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून हृदयरोग तज्ञ डॉ. बी.एस.पाटील, डॉ. मनीषा भावे असतील. ता.२३ डिसेंबर रोजी धुळे येथील प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. प्रकाश पाठक हे ‘कोट्याधीश पु.ल. देशपांडे’ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख अतिथी खा.शि.मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा असतील. ता.२४ डिसेंबर रोजी नगरपरिषद भडगावचे मुख्याधिकारी विकास नवाळे हे ‘ढाल तलवारी पलीकडचे छत्रपती शिवराय’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून प्रमुख अतिथी लोकमान्य शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अरविंद फुलपगारे, खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक हरी वाणी असतील. ता.२५ डिसेंबर रोजी माजलगाव येथील प्रसिद्ध कवी व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर हे ‘पर्यावरण आणि कविता’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून प्रमुख अतिथी हृदयरोग तज्ञ डॉ.अविनाश जोशी, अस्थिरोग तज्ञ डॉ.सुमित सूर्यवंशी असतील. ता.२६ डिसेंबर रोजी सोमय्या कॉलेज मुंबईचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.नरेंद्र पाठक हे ‘साहित्य, समाज आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून प्रमुख अतिथी आमदार अनिल पाटील व विशाल डेव्हलपर्सचे रामदास निकुंभ असतील. अमळनेर तालुक्यातील साहित्यिक वाचनप्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य टिळक स्मारक समितीचे अध्यक्ष बजरंग अग्रवाल, चिटणीस डॉ.प्रभाकर जोशी, विवेकानंद भांडारकर, आत्माराम चौधरी, लोटन पाटील व सहाय्यक लिपिक जगतराव निकुंभ व शतक महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे दिनेश नाईक, माजी प्राचार्य एस.आर.चौधरी, अनिल घासकडवी, सुरेश पवार, सोमनाथ ब्रम्हे आदींनी केले आहे.