अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक सप्ताहाची कार्यशाळा संपन्न


अमळनेर : येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक सप्ताहाची कार्यशाळा शिवाजी हायस्कूल येथे नुकतीच ता.२० रोजी अ.भा.ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष मकसूदभाई बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कार्यशाळेत दिशा गॅस एजन्सी चे संचालक श्री दिनेशभाई रेजा यांनी गॅस शेगडी, गॅस सिलेंडर व इतर उपकरणांविषयी प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. तसेच तालुका अध्यक्ष मकसूद भाई बोहरी यांनी घरगुती उपयोगात येणारी कोणतीही वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्यावी व फसवणूक होत असेल तर काय उपाय योजना कराव्यात याची माहिती दिली. महिला आघाडी प्रमुख ॲड.भारती अग्रवाल यांनी कायदेशीर प्रक्रिया कशी पूर्ण करावी याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राहक पंचायतीचे सचिव विजय शुक्ल यांनी केले. तालुका संघटक राजेंद्र सुतार यांनी सूत्रसंचालन तर शाळेचे शिक्षक गोसावी सर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक मधुकर पाटील, पर्यवेक्षक सुधाकर पाटील व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह वैधमापन विभागाचे गुलाब चौधरी, राजू पाटील उपस्थित होते. विजय शुक्ल यांनी वजन मापाविषयी माहिती दिली. ऑनलाइन खरेदी कशी करावी ?त्यामध्ये कशाप्रकारे फसगत होऊ शकते ? याबाबत माहिती सहसचिव योगेश पाने यांनी दिली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी तसेच विद्यार्थी वर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!