रावेर तालुका मराठा समाज वधु वर परिचय मेळावा १० नोव्हेंबर ला

रावेरः येथील रावेर तालुका मराठा समाज वधु वर परिचय व सामुहिक विवाह सोहळा समितीची बैठक नुकतीच कै. शेनाबाई गोंडु पंडीत मराठा समाज मगंल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सालाबादाप्रमाणे या वर्षीचा वधु वर परिचय मेळावा  व रेशीमबंध परिचय सुचीचे प्रकाशन  १० नोव्हेबंर ला घेण्याचे एकमताने ठरविण्यात आले. परिचय पत्रक रावेर येथील  योगराज ऑफसेट येथे उपलब्ध करण्यात आले असून फोटोसह परिचय पत्रक जमा करण्याची अंतीम तारीख १५ ऑक्टोबंर आहे.
यावेळी बैठकीत परिचय समितीचे अध्यक्ष डॉ.सुरेश पाटील, उपाध्यक्ष दत्ता पाटील, कार्याध्यक्ष घन:श्याम पाटील, सचिव प्रशांत पाटील, माजी अध्यक्ष सी एस.पाटील ,विकास मंडळाचे सचिव वामनराव पाटील, दिलीप पाटील, कडू पाटील, शेतकी संघाचे चेअरमन
पी.आर.पाटील, मॅनेजर विनोद चौधरी, पं स. सदस्य योगेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.के.पाटील, अॅड धनराज चौधरी, योगेश महाजन, ललीत चौधरी, अंबादास महाजन, कमलाकर पाटील, पंकज पाटील, दिनकर पाटील, राजेश महाजन, विलास ताठे, बबलू सांवत, सुभाष पाटील, योगेश पाटील, जगदीश चौधरी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!