
अमळनेर : येथील साने गुरुजी कर्मभुमी स्मारक प्रतिष्ठान व शिवशाही फाऊंडेशन यांच्यातर्फे सोमवार (ता.६) रोजी जी. एस. हायस्कुलच्या आयएमए हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता जेष्ठ लेखिका तथा संपादिका प्रा. डॉ. गीताली विनायक मंदाकिनी (पुणे) यांचे “माध्यमे व स्त्री-पुरुष समानता” या विषयावर व्याख्यान होणार आहे. साने गुरुजी कर्मभुमी स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.ए.जी.सराफ अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी पत्रकार दिनाच्या पार्श्वभुमीवर पत्रकारांचा सन्मानही केला जाणार आहे. तरी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाहक दर्शना पवार, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे व सचिव उमेश काटे यांनी केले आहे.