तालुकाध्यक्षपदी विजय भिमराव पाटील तर कार्याध्यक्षपदी प्रा हिरालाल पाटील

अमळनेर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा राज्यभर विस्तार होत असून पत्रकार संभाजी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजयजी भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोदजी सोनवणे, उपाध्यक्ष शैलेश पाटील, विभागीय सहसचिव संभाजी देवरे आणि जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, उपाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या पूर्व संमती व सूचनेनुसार नुकतीच बैठक संपन्न झाली. यात, अमळनेर तालुक्यातील पत्रकारांची नूतन कार्यकारणी स्थापन करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी विजय भिमराव पाटील (संपादक-स्वराज रक्षक), कार्याध्यक्षपदी प्रा हिरालाल पाटील (दैनिक सकाळ), उपाध्यक्षपदी कुंदन खैरनार ( AM न्यूज ब्युरो), सचिवपदी यदुवीर पाटील (दैनिक देशदूत) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अन्य कार्यकारिणीत गजानन पाटील (म मराठी) सह सचिव, सुरेश कांबळे (संपादक दिव्य खान्देश) कोषाध्यक्ष, गौरवकुमार पाटील (दैनिक बातमीदार) प्रसिद्धी प्रमुख, डॉ युवराज पाटील (दैनिक मताधिकार) संघटक, सुखदेव ठाकूर (दैनिक मर्डर) खजिनदार व कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय सुतार (दैनिक पुण्य नगरी), शरद पाटील (लोकमत), भगवान सोमनाथ पाटील (साप्ताहिक खान्देश आधार प्रतिनिधी), शशिकांत पाटील (जळगांव भूषण), प्रदिप पवार (दिव्य मराठी), प्रसाद प्रभाकर जोशी (साप्ता.दिज्ज वार्ता), शिवाजी विनायक पाटील (उपसंपादक- साप्ता. अमळनेर भूषण), कुणाल ठाकूर (खान्देश आधार), जेष्ठ सल्लागार म्हणून जगन्नाथ बडगुजर (संपादक-साप्ता.अटकाव), प्रकाश जैन (संपादक-साप्ता.खान्देश आधार), दिनेश नाईक (कार्यकरी संपादक-साप्ता.खान्देश आधार) यांंचा समावेेेश करण्यात आला आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारयांचे दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन.