सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला वीस हजारांची रोख मदत

कृषीभूषण साहेबराव पाटील यांची सढळ हाताने मदत


अमळनेर : पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला माजी आमदार कृृृषीभूषण साहेबराव पाटील यांनी नुुुुुकतीच भेट दिली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम त्यांना खूपच आवडला, त्यांनी समाधान व्यक्त केले. चांगल्या कामाास सढळ हाताने मदत करणे हा त्याचा छंद आहे. कृृृषीभूषण साहेबराव पाटील यांनी पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला पुस्तके घेण्यासाठी वीस हजार रुपयांची रोख मदत दिली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही मदत प्रेरणादायी ठरणार असल्याने या मदतीबद्दल पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा परिवाराचे विजयसिंग पवार, सर्व मार्गदर्शक व विद्यार्थ्यांतर्फे कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे विशेष आभार मानले.

यावेळी मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची खास तरतूद करून अमळनेर शहरात लवकरच अभ्यासिका सुरू करण्यात येईल असेही कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी जाहीर केले. यावेळी अमळनेरचे पीआय अंबादास मोरे, भैय्यासाहेब विनोद पाटील, मनोज बापू, जयवंतराव पाटील, विक्रांत पाटील, विजुभाऊ लांबोळे, राजू परदेशी, पत्रकार किरण पाटील, बोरसे आबा, पीएसआय संदीप भोई, चंदन पाटील व विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!