
अमळनेर : येथील विश्राम गृह परिसरातील रहिवासी निवृत्त ग्राम विस्तार अधिकारी नारायण गोबा वानखेडे (वय ७५) यांचे आज रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. अमळनेर आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाचे ते पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते होते. ते मूळचे अमळनेर तालुक्यातील मांडळ या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून व एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रा ता.८ रोजी सकाळी १० वाजता जी.एम. अपार्टमेंट, विश्राम गृह शेजारी, अमळनेर येथून निघेल.