धनदाई महाविद्यालयात स्वयंसिद्धा अभियान अंतर्गत ‘विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा’ चे उद्घाटन

अमळनेर : येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी कल्याण विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, ता.८ जानेवारी रोजी युवतीसभा या उपक्रमांतर्गत “स्वयंसिद्धा अभियानांतर्गत ‘विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा’ द्वारे विद्यार्थिनींमध्ये स्व संरक्षणार्थ जागृती निर्माण करून त्यांना त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याकरिता धनदाई महाविद्यालयात स्वयंसिद्धा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रशांत पाटील तर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. भगवान भालेराव होते. यावेळी प्रशिक्षक सुनील करंदीकर, युवती सभा समन्वयक डॉ. संगीता चन्द्राकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवतीसभा समन्वयक डॉ.संगीता चन्द्राकर यांनी केले. उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर प्रशिक्षक सुनील करंदीकर यांनी विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाला डॉ.राहुल इंगळे, प्रा. महादेव तोंडे, प्रा. प्रवीण पवार, प्रा. लीलाधर पाटील, प्रा. पुनम वाघ, प्रा.उज्वला सोनवणे, प्रा.गायत्री पाटील, प्रा.सुवर्णा भावसार, प्रा. दिनेश पटले, प्रा. राखी घरटे तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मीनाक्षी इंगोले यांनी केले तर प्रा.डॉ. शुभांगी चव्हाण यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!