उपाध्यक्ष पदासाठी ॲड. संभाजी पाटील तर सचिवपदी ॲड.दिनेश पाटील यांची बिनविरोध निवड

अमळनेर : येथे नुकत्याच झालेल्या वकील संघाच्या निवडणुकीत ॲड.शकील काझी हे अध्यक्षपदी निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड.विवेकानंद लाठी हे पराभूत झाले. अमळनेर वकील संघाच्या कार्यकारीणी निवडीच्या या प्रक्रियेत उपाध्यक्ष पदासाठी ॲड. संभाजी पाटील (निम) तर सचिवपदी ॲड.दिनेश पाटील (एकलहरे) हे बिनविरोध निवडून आले. या दोन्हीही पदांसाठी या दोघा व्यतिरिक्त कुणीही अर्ज दाखल केला नव्हता.
निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अशोक बोरसे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. केशवराव कुलकर्णी यांनी सहाय्य केले. सिनियर तसेच ज्युनियर सर्व सभासदांनी निवडणुक प्रक्रियेत भाग घेतला. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुक पार पडली.