संत गजानन महाराज मंदीरात जागतिक पारायण दिवस संपन्न


अमळनेर : शहरातील मुंदडा नगर येथील प्रति शेगाव व भाविकांचे श्रद्धास्थान असलेेेेेल्या संत गजानन महाराज मंदीरात जागतिक पारायण दिन साजरा करण्यात आला. यासाठी एकूण २५ महिला व पुरुष पारायणाला बसले होते.
संत गजानन महाराज मंदीरात दरवर्षी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबवले जातात यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार व संचालक मंडळ नेहमी प्रयत्नशील असते. जिल्ह्यातून अनेक भाविक संत गजानन महाराज मंदीरात दर्शनासाठी येत असतात. मंंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पारायणासाठी ज्योती पवार, सुनील पाटील ,उर्मिला जगताप, सरला चव्हाण, शोभा कोळी, वंदना भारती व भाविक महिला व पुरुष बसले होते. गजानन विजय यातील २१ अध्यायांचे अखंड पारायण करण्यात आले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!