
अमळनेर : कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील रहिवासी त्रिवेनाबाई शिवदास काटे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६२ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.१४) सकाळी नऊला कोळपिंप्री येथील राहत्या घरापासून निघणार आहे. माजी उपसरपंच तथा फ्रुट सेल सोसायटीचे माजी उपाध्यक्ष शिवदास भगा काटे यांच्या पत्नी तर दिनेश काटे यांच्या त्या आई होत.