जि.प.शाळा शिरूड येथे बाल आनंद मेळावा संपन्न

अमळनेर : तालुक्यातील जि.प.शाळा शिरूड येथे नुकताच ता.११ रोजी सालाबादा प्रमाणे बाल आनंद मेळावा २०२० चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना गणितातील खरेदी विक्री, हिशेब, पैशांची देवाणघेवाण, संवाद कौशल्य या विविध संकल्पना प्रत्यक्ष अनूभूतीतून समजाव्यात या उद्देशाने मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बॅंकेच्या संचालिका तिलोत्तमाताई पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम अहिरे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सरपंच सुपडू पाटील, माजी सरपंच बापुराव महाजन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदलाल कुंभार, शिरुड विकास मंचचे प्रा.सुभाष जिभाऊ, इंजिनिअर प्रफूल पाटील, केंद्रप्रमुख रविंद्र पाटील, मुख्याध्यापक अशोक पाटील आदी मान्यवरांनी केले. याप्रसंगी अमळनेर तालुका हागणदारी मुक्तीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचा शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी सत्कार केला.
विद्यार्थ्यांनी लावलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर उपस्थित मान्यवरांनी भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थीनींनी साकारलेल्या विविध सामाजिक संदेश देणा-या रांगोळी प्रदर्शनाची पाहणी करुन कौतुक केले. इयत्ता पहीली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाणीपूरी, पाव वडा, शेंगा, पोहे, मूग भजी, आंबाड्याच्या दशम्या, फुनके, बासूंदी, बदामशेक, चहा, विद्यार्थी बचत बँक अशा विविध पन्नास स्टॉल ची उत्कृष्ट मांडणी केलेली होती. खाद्य पदार्थांच्या खरेदी विक्री तून मेळाव्यात हजारोंची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मेळावा यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अशोक पाटील, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र नांदोडे, चंद्रकांत पाटील, छोटूलाल सूर्यवंशी, संगीता पाटील, दर्शना चौधरी यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!