राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत सैनिक किरण पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

राजमुद्रा फाउंडेशनचा अभिनव उपक्रम… मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थीनींना व अमळनेर तालुका सैनिक संघटनेला मदतीचा हात

अमळनेर : येथील राजमुद्रा फाउंडेशन तर्फे भारतीय सैन्यदलाचे किरण जयवंतराव पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. ढेकू रोडवरील पटवारी कॉलनीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्यदलात किरण पाटील यांनी १७ वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. यानिमित्त चोपडा येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थीनींना ब्लॅक बोर्ड, तांदूळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. शिवाय, अमळनेर तालुका सैनिक संघटनेला पाच हजाराचा धनादेश देऊन सैनिकी पेशाला मदतीची फुंकर घालत समाज कल्याणाची ज्योत तेवत ठेवत समाजापुढे नवा आदर्श ठेवला. राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत सैनिक किरण पाटील यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचे चित्र पालटून कृतज्ञता सोहळ्यात रूपांतर केले. त्रिवेणी संगमाचा योग घडवून आणणारे सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक शामकांत पाटील यांनी समाजातील गरजूूंना सहयोग देऊन राजमुद्रा फाउंडेशनने जनमानसात मानवतेची प्रतिमा कोरून सोहळ्यास भावस्पर्शाची किनार जोडली.
कार्यक्रमास आ.स्मिता वाघ, माजी आ.शिरिष चौधरी, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, न.पा.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गायकवाड, सेवानिवृत्त पुरवठा अधिकारी जयवंतराव पाटील, सौ.छायाताई जयवंतराव पाटील, गणपुरचे सरपंच भालेराव पाटील, नगरसेवक शामकांत पाटील, प्रशांत पाटील, डॉ.हेमराज पाटील, सुभेदार योगीराज पाटील, वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ, राजेंद्र यादव, भीरू पाटील, दयाराम पाटील, अनिल बोरसे, अक्षय चव्हाण, किरण सूर्यवंशी, आशिष पवार, छोटू जैन, योगेश मुंदडा,भरत ललवाणी, बाळू कोठारी, प्रदीप अग्रवाल, विजय पाटील, नाना पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!