पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने संदीप घोरपडे व कु.भूमिका घोरपडे यांचा सत्कार

अमळनेर : सतराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगांव केंद्रातून अमळनेर येथील सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या ‘अ..आ..आकलन’ या बालनाटयाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. अमळनेर सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक तर त्यांची मुलगी कु.भूमिका घोरपडे हिला उत्कृष्ट अभिनयाबद्दल पारितोषिक प्राप्त झाले.
त्यांच्या या यशाबद्दल पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने उत्कृष्ट दिग्दर्शक संदीप घोरपडे व मुलगी उत्कृष्ट अभिनय भूमिका घोरपडे, शिक्षिका, सौ. गितांंजली घोरपडे यांचा शाल, बुके, टोपी, पेन देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, वाचनालयाचे माजी चिटणीस भाऊसाहेब देशमुख, सह चिटणीस सुमीत धाडकर, संचालक ईश्वर महाजन, दिपक वाल्हे, भगिनी मंडळाच्या शिक्षीका ज्योतीर्मयी बाविस्कर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना संदीप घोरपडे यांनी ‘अ..आ..आकलन’ बालनाट्य बसविण्यासाठी आलेले अनुभव सविस्तर कथन केले. कु.भूमिका घोरपडे हिने आम्हाला हे बालनाट्य सादर करण्यासाठी अमळनेर येथील शिवाजी नाटयगृहात व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर तो आमचा खरा सत्कार असेल असे सांगितले. या बाबत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व माजी चिटणीस भाऊसाहेब देशमुख यांनी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल असे सांगितले.