
अमळनेर : येथील अँँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलचा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी दुर्वेश उमेश सांगळे याने जेईई मेन्स परीक्षेत ९७.४७ टक्के गुण संपादन करुन घवघवीत यश संपादन केले आहे. यासाठी त्यास शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या अद्ययावत सुविधांचा अभ्यासासाठी उपयोग होत आहे. यामुळेच अमळनेर शहरातून सी.बी.एस.ई च्या विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल सुरु आहे. त्यात दुर्वेश सांगळे या विद्यार्थ्यांने संपादन केलेले यश संस्थेची मान ऊंचावणारे आहे. भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना यशस्वीपणे घडविण्याचा संस्थेचा मानस आहे. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा अँँड ललिता पाटील, सचिव प्रा.शाम पाटील, संचालक पराग पाटील, संचालक प्रा.देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्रशासन अधिकारी अमोल माळी आणि शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.