
अमळनेर : तालुक्यातील मूळचे अमळगाव येथील रहिवासी प्रकाश दयाराम चौधरी यांचा मुलगा योगीराज प्रकाश चौधरी याने जेईई मेन्स परीक्षेत ९९.२२ टक्के गुण संपादन करुन यश संपादन केले आहे. तो मुलुंड येथील R.W.J.C. कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्यास लुड्स हायस्कूल, कल्याण येथे एस.एस.सी ला ९३% गुण मिळाले होते. जेईई मेन्स साठी त्यास महाविद्यालयातील प्राध्यापक, ठाणे येथील विद्यालंकार क्लासच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.