
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील जि.प.मराठी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सरस्वती मातेच्या प्रतीमेचे पूजन करुन स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. अमळनेर येथील खा.शि.मंडळाचे माजी अध्यक्ष व स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल चे संस्थापक अध्यक्ष बजरंगशेट अग्रवाल कार्यक्रमाचे उद्घाटक होते. कार्यक्रमाचेे अध्यक्ष म्हणून अमळनेर ग्रामपंचायत विभाग नाशिक विभागाचे माजी आयुक्त वाय.एफ.साळुंखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खवशी येथील माजी सरपंच डॉ.शामकांत देशमुख, माजी मुख्याध्यापक अभिमन वामन कापडे (कापडे गुरूजी) होते. यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
स्नेहसंमेलनाचे हे पहिलेच वर्ष होते. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. खवशी येथील माजी सरपंच डॉ.शामकांत देशमुख यांचे जावई डॉ.अतुल रामभाऊ देशमुख व डॉ.सृष्टी अतुल देशमुख, पुणे यांंचेकडूून ५ हजार रुपये व अमळनेर येथील खा.शि.मंडळाचे माजी अध्यक्ष बजरंग अग्रवाल यांच्या वतीने ५ हजार रुपये देणगी मिळाली. बोरखेडा, ता कन्नड येथील सागर दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी १००० रुपयेे जाहीर केले. मान्यवर व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करत रोख स्वरूपात बक्षीसे दिली. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच अवंतीताई पवार, उपसरपंच वर्षा सूर्यवंशी, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रसाद कापडे, उपाध्यक्ष जिजाबराव कोळी, समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध विविध का. संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, भगवान गोसावी, कैलास पाटील, आनंदा कापडेे, रोहीदास कापडेे, एकनाथ आबा, हेमकांत देसले, धनराज पवार, सचिन सूर्यवंशी, विश्वास पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक कंखरे सर यांनी कार्यक्रमाचेे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे चौधरी सर यांनी तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसाद कापडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी परीश्रम घेतले.