शिवजयंती मिरवणुकीत चि. शिवतेज चा प्रथम वाढदिवस साजरा

अमळनेर : येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या मानाच्या भव्य मिरवणुकीत सहभागी हजारो शिवभक्तांच्या साक्षीने शिवतेज रणजित शिंदे याचा प्रथम वाढदिवस साजरा करुन नवा पायंडा घातला. वाढदिवसाच्या निमित्ताने पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या शुभहस्ते शिवभक्तांना अल्पोपहार वितरित करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, मनोज शिंगाणे, पारस धाप यांचेसह पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी मिरवणूकीच्या सुरुवातीला शिवतेजच्या वाढदिवसाचा केक ही कापण्यात आला. शिवजयंती मिरवणुकीत वाढदिवस साजरा करून पारंपरिक वाढदिवस साजरा करण्याला फाटा देत वेगळी प्रथा रणजित शिंदे व सौ शैलजा शिंदे या दांपत्याने निर्माण केली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!