शेकडो हिंदू मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी साजरी केली छत्रपती शिवराय यांची जयंती

लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनातील उपक्रम

अमळनेर : येथील लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलन मंडपात शेकडो हिंदू मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने परिसर शिवमय केला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात १ फेब्रुवारी पासून एन आर सी, सी ए ए रद्द करा या मागणीसाठी बेमुदत साखळी आंदोलन सुरू आहे.

शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस निवृत्त निवासी जिल्हाधिकारी एच.टी.माळी, प्रा.अशोक पवार, रियजुद्दीन मौलाना, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, अँड रज्जाक शेख, अँड शकील काझी, अखलाख भाई, गयास अहेलेकार, राजू शेख अल्लाउद्दीन, नगरसेवक फिरोज मिस्तरी आदिंनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. यावेळी हाजी मुजफ्फर शेख, अय्यूब पठाण, हाजी के बी शेख, शराफत मिस्तरी, सलिम कुरेशी, रुक्नोद्दीन अहेलेकार, शेर खा पठाण, रईस भाई, खालीक अहेलेकार, निसार शेख, मुशरत अली, अब्दुल रहेमान मिस्तरी, बशीर बांगी, जाकिर मिस्तरी, जाफर मिस्तरी, महंमद अली, नुरुद्दीन शेख, हाजी निजाम, अस्लम बागवान आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. आंदोलन मंडपात आंदोलन कर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने परिसर शिवमय केला होता.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!