
पारोळा : तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी इंदूबाई मन्साराम काटे यांचे आज सायंकाळी चारला वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा उद्या ता.२१ रोजी सकाळी १० वाजता कोळपिंप्री येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. विकास संस्थेचे चेअरमन डॉ.नगराज काटे, वावडे हायस्कुलचे माध्यमिक शिक्षक व्ही.एम.काटे यांच्या त्या मातोश्री तर नितीन काटे व डॉ.सचिन काटे यांच्या आजी होत.