धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटी चा उपक्रम

धुळे : शिवजन्मोत्सव निमित्ताने धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीतर्फे यंदाचा राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षक रत्न पुरस्कार व राजमाता माँसाहेब जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कारांचे वितरण नुकतेच प्रा.आर.ओ.निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोंदूर येथे करण्यात आले. याप्रसंगी कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात कार्य करणारे शिक्षक आणि शिक्षिका यांना मान्यवरांचे हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील वाचन चळवळ व संगणक साक्षरता अभियानाचे कार्यकर्ते प्रवीण महाजन (कोठलीकर), बोरविहीर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व्ही.एस.सोनवणे, धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष डी.के.पवार, प्रा.आर.ओ.निकम, बी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सागर जाधव, धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहुल एच.पाटील, मार्गदर्शक वासुदेव शेलकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले.
जाणता राजा शिक्षक रत्न पुरस्कार-२०२० चे मानकरी…
सुनिल अमृत गोपाल (आर.सी.पटेल अनुदानित प्राथमिक स्कूल, वाघाडी), नरेंद्र गुलाबराव बाविस्कर (ना.शि.मंडळाचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तामसवाडी), ध्रुवास ममराज राठोड (शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव), दिपक रोहिदास पाटील (माध्यमिक विद्यालय, जिराळी -इंधवे), सदाशिव सोमा महाजन (हस्ती पब्लिक स्कूल,दोंडाईचा), संदीप हिरामण पाटील (ना.शि.मंडळाचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,तामसवाडी), प्रशांत दत्तात्रय कोतकर (शांताई माध्यमिक विद्यालय,पिंपळनेर), देविदास शिवराज हिरे (नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव ता.चांदवड), श्रीराम साहेबराव महाजन (चेंबूर कर्नाटका हायस्कूल,चेंबूर, मुंबई), संजयकुमार उमेशचंद्र महाजन (किसान विद्यालय, शिंदखेडा), अनिल अरुण काळे (विकास विद्यालय, नरडाणा), रविंद्र रामदास सोनगीरे (आर.सी.पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालय, शिरपूर), चेतन रामदास जाधव (श्री. पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय, मोहाडी उपनगर), मनोहर धनगर चौधरी (जि.प.शाळा,चारणपाडा ता.शिरपूर), दिलीप नामदेव पाटील (जि.प.शाळा, विखरण ता.शिरपूर), बाबुराव गुंडाजी गायकवाड (राजा शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बजाजनगर, औरंगाबाद), राकेश हिराजी पगारे (माधव स्मृती प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा,सामोडे ता.साक्री), चंद्रकांत बापू नेरकर (जि.प.शाळा, मोरदडगांव ता.धुळे), विशाल रमेश राठोड (सौ.के.एस.ए.मुलींचे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर जि.जळगाव), विनोद अशोकराव सोनवणे (माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोंढाळे पिंप्री), प्रा.चंद्रकांत सदाशिव सोनार (डॉ.पां.रा.घोगरे कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर), राजेंद्र धनालाल गुरव (स्वा.वि.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दोंडाईचा), संजय सोमगीर गोसावी व योगेश देविदास जोशी (श्रीमंत गो.सं.देवकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विरदेल ता.शिंदखेडा), सुनिल न्हानु दाभाडे (मानव सेवा विद्यालय, जळगाव), सुरेश बाबुराव सोनवणे (स.म.पि.रा.पाटील विद्यालय, बोरविहीर ता.धुळे), प्रा.समीर विष्णू घोडेस्वार, प्रा.चंद्रकांत शिवाजी कोळी, प्रा.अनिल रविंद्र गजरे (इंदिराबाई लालवाणी कनिष्ठ महाविद्यालय, जामनेर), विजय रामचंद्र सैतवाल (न्यु इंग्लिश स्कूल,मालदाभाडी ता.जामनेर), अशोक दिगंबर जाधव (राजर्षी छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, कारवा जि.चंद्रपूर), अनिल भगवान माळी (जि.प.मराठी शाळा, दत्ताणे ता.शिंदखेडा), अनिल विज्ञान महिरराव (जि.प.मराठी शाळा, नवपाडा (मुखेड) ता.शिरपूर), सुनील प्रभाकर वाघ (जी.एस.हायस्कूल, अमळनेर), प्रदीप दिलीपराव पाटील (जवाहर नूतन विद्यालय, वारुड ता.शिंदखेडा)
राजमाता माँसाहेब जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार-२०२० चे मानकरी…
सुनिता आधार पाटील (स.म.पि.रा.पाटील विद्यालय, बोरविहीर ता.धुळे), डॉ. सुरेखा शिवाजी बोरसे (जि.प.मराठी शाळा, कावपिंप्री ता.अमळनेर), जयश्री महेंद्र जाधव (जि.प.मराठी शाळा,दहिवद बु.ll जि.बुलढाणा), माधुरी विजय देवरे (केंद्रीय विद्यालय आय.एस.पी.,नाशिक रोड), सुनिता विश्वनाथ हंडोरे (के.जे.मेहता हायस्कूल,नाशिक रोड) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहुल एच.पाटील, उपाध्यक्ष योगेश वाघ, सचिव शशिकांत पाटील, वासुदेव शेलकर, संभाजी बोरसे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पवार यांनी केले.