
अमळनेर : शहर व तालुक्यातील मल्लांना राज्य स्तरावर तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होता यावे, विजय मिळवून अमळनेर तालुक्याचे नाव राज्यातच नव्हे तर देशात कुस्ती खेळासाठी प्रसिध्द व्हावे यासाठी तालुक्यातील कुस्तीगीरांची कुस्ती आखाड्याची मागणी होती. कुस्तीगीरांच्या वतीने संजय कौतिक पाटील, प्रताप शिंपी, संजय पहेलवान, रावसाहेब पहेलवान, शब्बीर पहेलवान यांनी मागणी लावून धरली होती. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी दुरदृष्टी डोळयासमोर ठेऊन बोरी नदी पात्रात नगरपालिकेमार्फत ४० फुट व्यासाचा व १ मीटर उंचीच्या आखाड्याचे नुकतेच भुमिपुजन केले. सदर आखाड्याचे भुमिपूजन प्रसंगी मा.नगरसेवक संजय कौतिक पाटील, नगरसेवक प्रतापआबा शिंपी, शेखा मिस्तरी, निशांत अग्रवाल, संजय पहेलवान, रावसाहेब पहेलवान, शब्बीर पहेलवान, बाबु साळुंखे, समाधान धनगर, विजय पाटील, बाळु पाटील, रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अमळनेर शहरातील कोंडाजी व्यायामशाळा- शिवाजीनगर पैलाड, जयहिंद व्यायाम शाळा- शिरुडनाका, पवनपुत्र व्यायाम शाळा- भोईवाडा, जयगुरु व्यायाम शाळा- झामीचौक, बालवीर व्यायाम शाळा- बंगाली फाईल, सानेगुरुजी व्यायाम शाळा- सानेनगर, सिध्दार्थ व्यायाम शाळा- फरशी रोड, चाँद शहावली व्यायाम शाळा- कसाली मोहल्ला, कुरेशी व्यायाम शाळा- अंदरपुरा, प्रतापकुमार व्यायाम शाळा- गलवाडे रोड आदी व्यायाम शाळांच्या माध्यमातुन तरुणांना निरोगी व सुदृढ शरीर कमवण्याची संधी मिळत आहे. भविष्यात आखाड्याच्या निर्मितीने अमळनेर शहर व तालुक्यातील मल्लांना राज्य स्तरावर कुस्ती स्पर्धेत सहभागी होता येवून तालुक्याचे नाव कुस्ती खेळासाठी प्रसिध्द होणार आहे.