राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे रविवारी युवा सन्मान सोहळ्याचे आयोजन

अमळनेर : येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने उद्या रविवार, ता.२३ रोजी जी.एस.हायस्कूल मधील आय.एम.ए. सभागृहात युवा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सनीभाऊ मानकर उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उप जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे प्रमुख वक्ते असतील.

यावेळी राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे प्रदेश अध्यक्ष उमेशजी पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्षा रिताताई बाविस्कर, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमाताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटिक, तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष योजनाताई पाटील, शहराध्यक्ष आशाताई चावरिया, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, शहराध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनिल शिंपी यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!