अमळनेर : येथील राजमुद्रा फाउंडेशन तर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ढेकू रोडवरील न्यू पटवारी कॉलनी येथून ता.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती शिवरायांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील, विधान परिषद सदस्य स्मिता वाघ, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई पाटील, अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, विक्रांत पाटील, अनिल बोरसे, विजू आप्पा, बाळासाहेब शिसोदे, जयवंतराव पाटील, बांधकाम व्यावसायिक ओवेस मोमीन, श्याम कदम, विजय पाटील (सा.बां.वि,मुंबई), नानासाहेब सूर्यवंशी, आशिष पवार, किरण सूर्यवंशी, बापू नेरकर, विजय चव्हाण, योगेश नेरकर आदी उपस्थित होते.
यावेळी युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम राबवण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमुद्रा ढोल पथकातील वादक व प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी सायली किरण बडगुजर हिला आट्या-पाट्या या खेळात राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन तिचा गौरव करण्यात आला. गणेशोत्सव काळात राजमुद्रा ढोल पथकातील वादक अंकित चतुर पाटील याचे खदाणीत बुडून निधन झाल्याने त्यास अश्रूपूर्ण नयनांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजमुद्रा फाउंडेशनचे उपाध्यक्ष अक्षय चव्हाण, किरण पाटील, भूषण भदाणे, दर्पण वाघ, विशाल पाटील, उज्वल मोरे, अक्षय पाटील, निनाद शिसोदे, राहुल पाटील, सागर ठाकरे, कुणाल पाटील, मयूर पाटील, हर्षल महाजन, सागर भावसार, तुषार वायकर, मंजित सोनार,अमोल जव्हेरी, निलेश वानखेडे, हर्षल कोळी, शुभम खुणेपिंपरे, किशोर पाटील, सुमित पाटील, निलेश महाजन, हर्षल महाजन, आशुतोष निकम, गौरव पवार, विठ्ठल पाटील, गणेश भोई, उमेश पाटील, अधिकराव पाटील आदींनी सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व उपस्थितांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक श्याम पाटील यांनी आभार मानले.

