अमळनेर : नुकतीच भारतीय जनता पार्टीने उमेदवारीची चौथी यादी जाहीर केली असून त्यात मुक्ताईनगर मतदार संघासाठी रोहिणीताई खडसे खेवलकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तिसऱ्या यादीतही नाव जाहीर न झाल्याने एकनाथ खडसे काय निर्णय घेतात याकडे याकडे सर्वांचे लक्ष होते.
रोहिणी खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा असून त्यांना एकनाथ खडसे यांनी राजकारणात आणून राजकारणाचा पाया रचला आहे. भाजपाने रोहिणी खडसे यांना उमेदवारी देऊन आपले जिल्ह्यातील वर्चस्व टिकविण्याचा चांगला मार्ग स्विकारला असल्याचे बोलले जात आहे.