अमळनेर येथे गांधी जयंतीस प्लॉस्टिक मुक्तीसाठी जनजागृती

लायन्स क्लब, स्वामी विवेकानंद इंटरनँशनल स्कूल व रेल्वे प्रशासनाचा संयुक्त उपक्रम

अमळनेर : प्लॉस्टिकचा वापर हद्दपार करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून विविध संस्थांनी पुढाकार घेत प्लॉस्टिक जमा करुन कापडी पिशव्यांचे वाटप केले. येथील लायन्स क्लब, स्वामी विवेकानंद इंटरनँशनल स्कूल व रेल्वे प्रशासन यांनी संयुक्तपणे रेल्वे स्टेशन परिसरात ज्या कोणी प्रवाशांकडून प्लॉस्टिक पिशवी दिसेल ती जमा करुन त्यास कापडी पिशवी देण्यात येवून जनजागृती करण्यात आली. यावेळी नीरज अग्रवाल, सरजू गोकलाणी, रेल्वे प्रशासनचे अधिकारी, स्वामी विवेकानंद इंटरनँशनल स्कूल चे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

रोटरी क्लब व नगरपालिका तर्फे जनजागृती

येथील मुख्य आठवडे बाजारात गोविंद मुंदडा व अर्बन बँकेचे संचालक शांताराम ठाकूर यांचे हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अमळनेर पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर ज्या कोणाकडे प्लॉस्टिक पिशवी दिसेल ती जमा करुन त्यास कापडी पिशवी देण्यात येवून जनजागृती करण्यात आली. यावेळी रोटरीचे अध्यक्ष पूनम कोचर, सेक्रेटरी वृषभ पारख, प्रोजेक्ट चेअरमन अजय केले, सौरभ छाजेड, अभिजीत भांडारकर, देवांग शहा, विशाल शर्मा, प्रतिक जैन, प्रदीप पारख, झामनदास सैनानी, महेश पाटील, हितेष गोहील, अविनाश अमृतकर आदि उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!