अमळनेर : येथील भाजपा,शिवसेना, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार आ.शिरीष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज तालुका व शहरातील पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. अमळनेर येथील वाडी संस्थान येथून आशिर्वाद घेऊन पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, पाचकंदील चौक, सुभाष चौक, धुळे रोड, महाराणा प्रताप चौक या मार्गाने भव्य जनसमुदाय उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसीलदार कार्यालयात पोहचला.
आमदार चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी सिमा आहिरे, तहसीलदार मिंलीद वाघ यांच्याकडे सादर केला. यावेळी हिरा उद्योग समुहाचे अध्यक्ष डाँ रवींद्र चौधरी, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, अँड ललिता पाटील, शिवसेनेचे डॉ राजेंद्र पिंगळे, सुभाष चौधरी, कल्याण पाटील, सुभाष भांडारकर, नितीन निळे, आ.शिरीष चौधरी मित्र परीवार आघाडीचे बबली पाठक, अनिल महाजन, मोहन सातपुते, लालचंद सैनानी, काशिनाथ चौधरी, पंकज चौधरी, नरेंद्र चौधरी, विक्रांत पाटील, नगरसेवक, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, भाजप, शिवसेना, रिपाई, रासपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.