अमळनेर : येथे काल ता.४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून अंकलेश मच्छिंद्र पाटील, तर वंचित बहुजन आघाडीकडून श्रावण धर्मा वंजारी यांनीही आपले उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी सिमा आहिरे, तहसीलदार मिंलीद वाघ यांच्याकडे सादर केले.
अंकलेश पाटील हे तालुक्यातील शहापूरचे रहिवासी असून पुण्यात त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. काही वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास असले तरी त्यांचा अमळनेर मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क अाहे. अमळनेर मतदार संघाचा विकास करण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध असून रोजगार व पाडळ से धरणाच्या मुद्यावर त्यांचा जोर राहणार आहे. आज पर्यंत संपुर्ण महाराष्ट्रातुन जवळ जवळ ४ ते ५ हजार बेरोजगार युवकांना मोठ मोठ्या शहरात रोजगार मिळवून दिला आहे. म्हणून युवा पिढी मोठ्या प्रमाणात अंकलेश पाटील यांच्या कडे आकर्षीली जाईल अशी चर्चा सुरू आहे.
अमळनेर विधान सभा मतदार संघात श्रावण धर्मा वंजारी (श्रावण महाराज) यांना उमेदवारी मिळाल्याने बहुजन समाजात आनंदाचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडी च्या पक्ष श्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. संपूर्ण बहुजन समाजास न्याय मिळवून देण्यास प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही श्रावण महाराज यांनी दिली आहे.