
अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तू. पाटील कला महाविद्यालयात नुकतीच महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत देसले यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केला. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रा. माधव वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य वसंत देसले यांनी या थोर नेत्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. माळी यांनी केले. तर आभार प्रा. महाजन यांनी मानले.