
अमळनेर : येथील आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत होळीला सुरुवात झाली आहे. होळी पेटवून पाच दिवसीय होळीचा शिमगा उत्सव साजरा करण्याची परंपरा शहरी वातावरणात बदलत्या काळातही जोपासण्याचा प्रयत्न ठाकूरांच्या सामूहिक होळीतून होत आहे. येथील श्रीराम कॉलनी परिसरातील संत सखाराम महाराजांच्या शेतात सालाबादाप्रमाणे होळी करण्यात आली. होळीच्या निमित्ताने वर्षभरातून एकदाच सर्व ठाकूर पुरुष, महिला, युवक युवती, अबाल वृद्ध एकत्रित आले होते. ठाकूरांच्या होळीचे वैशिष्ट्या नुसार, उंबराचे झाडाचा दांडा उभा करून त्यास पायाशी गोवऱ्या ठेवून होळीसाठी कोरडे लाकडं लावली. लाकडं, गोवऱ्या, होळीचे पूजा, सजावट साहित्य सामूहिक वर्गणीतून गोळा केली. रंगेबिरंगी पताका, फुगे लावून महिला आणि पुरुषांनी होळी सजविली.
जमातीचे स्थानिक प्रमुख दिलीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रकाश वाघ, मिनाबाई वानखेडे, अपेक्षा पवार, गुणवंत वाघ, प्रकाश ठाकूर, संजय ठाकूर आदिंनी होळीला पुष्पहार, हारडा, हार कंगन अर्पण करून पूजन केले. होळीला उपस्थित समाज बांधवांनी अग्नि देऊन होळी पेटवली. होळीला नैवेद्य देऊन ‘होळी रे होळी’ च्या एकच जल्लोषात होळीभोवती आनंदी वातावरणात फेर धरण्यात आला. याप्रसंगी होळीचा प्रसाद म्हणून सर्वांना गुळाची जिलेबी वाटण्यात आली. होळीच्या अग्नीभोवती रात्री उशिरापर्यंत थांबुन लोकांनी आनंद घेतला. याप्रसंगी उमेश ठाकूर, देविदास ठाकूर, बेबीबाई ठाकूर, संजय सूर्यवंशी, निलेश वाघ, रविंद्र वानखेडे, धनराज ठाकूर, प्रविण ठाकूर, अनिल ठाकूर, उमाकांत ठाकूर, कोकिळाबाई ठाकूर, कलाबाई ठाकूर, यशवंतराव सूर्यवंशी, जयवंतराव जाधव, मनिषा ठाकूर, लक्ष्मीबाई ठाकूर, ज्ञानेश्वर ठाकूर, सुरेश ठाकूर, सौ.सरला जाधव, हेमंत वानखेडे, मंगल ठाकूर, देवका ठाकूर, सौ भारती ठाकूर, मिना ठाकूर, सतिष ठाकूर, हिम्मत ठाकूर, विनोद ठाकूर, सचिन ठाकूर आदिंसह मोठ्या संख्येने ठाकूर समाजाचे लोक होळी उत्सवात सहभागी झाले होते.