अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी तथा प्रगतशील शेतकरी जगतराव दंगल पाटील यांचे औरंगाबाद येथे खाजगी रुगणालयात आज ता.१२ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते ७१ वर्षांचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, चार भाऊ, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. अरुण दंगल पाटील यांचे ते बंधू तर ह.भ.प. भालचंद्र महाराज यांचे वडील होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या ता.१३ रोजी सकाळी ९ वाजता त्यांचे राहत्या घरापासून जळोद येथे नेण्यात येणार आहे. दशक्रियाविधी शनिवार ता.२१ रोजी असून गंधमुक्ती व उत्तरकार्य मंगळवार ता.२४ रोजी खवशी येथे आयोजिले आहे.