
अमळनेर : तालुक्यातील सबगव्हाण येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना विषाणू आजारा विषयी आरोग्य शिक्षण देण्यात आले. अंगणवाडी मध्ये बाहेर गावाहून आलेल्या ४२ लोकांना उजव्या हाताच्या मनगटावर होम कॉरन्टाईन चा शिक्का मारण्यात आला. त्यांनी १४ दिवस घरातच थांबावे, गर्दीच्या ठिकाणी बाहेर जाऊ नये अशी समज देण्यात आली. यावेळी कोरोना विषाणू विषयी माहिती पत्रक, मास्क वाटण्यात आले. याप्रसंगी सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र पाटील, आरोग्य सेवक दीपक पाटील, नर्स सुवर्णा धनगर, आशा सेविका रुपाली पाटील, अंगणवाडी ताई छोट्याबाई भिल, पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, श्रीराम पाटील, कैलास पाटील, संतोष पाटील, सुरेश पाटील, वासुदेव पाटील, बाळू पाटील आदी उपस्थित होते.