
अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेचा कोणत्याही सामाजिक कार्यात सहभाग असतो. तीच सामाजिक बांधिलकी जपत संस्थेतर्फे कोरोना निर्मूलनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आज २१ हजार रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी पदाधिकाऱ्यांसोबत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हा धनादेश तहसीलदार मिलिंद वाघ यांच्याकडे सुपूर्द केला. सर्वांनी आपापल्या चेहऱ्यावर मास्क लावले होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन.पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव व सौ. जयश्री साबे उपस्थित होते.