संविधानात तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा सार : ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. आशिष जाधवर

मराठी भाषेला अभिजात राजभाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल खडीसाखर वाटत कार्यक्रमस्थळी स्वागत

अमळनेर : भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय या मूल्यांच्या आधारावर भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. संविधान लिहिताना बाबासाहेबांनी देशाच्या भवितव्याचा, भविष्याचा विचार केला. तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा सार प्रज्ञा, शील आणि करुणा यात समावलेला आहे म्हणून बाबासाहेब महान आहेत असे मत छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. आशिष जाधवर यांनी व्यक्त केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक वाचनालय तर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेत ‘भारतीय संविधान आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ॲड. श्रावण ब्रम्हे, प्रगतशील शेतकरी विलास शिंदे होते. सोबत विचार मंचावर मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष अविनाश जोशी, प्रा. विजय तुंटे, संचालक सौ. वसुंधरा लांडगे, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी,होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती चे पूजन झाले. प्रा. शीला पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिल्यावर सत्कार करण्यात आला.

डॉ. अविनाश जोशी प्रास्ताविकात म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात राजभाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला याबद्दल आम्ही कार्यक्रम स्थळी मंडळाच्या वतीने आनंद म्हणून वाद्य वाजवून स्वागत केले. सोबतच खडीसाखर वाटून तोंड गोड केले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. साहित्य संमेलनावेळी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, निलमताई गोरे, मराठी भाषेचे सचिव शामकांत देवरे यांनी दिली होती. संमेलनामध्ये तो पहिला ठराव होता की, मराठी राजभाषा असल्याचे संमेलनात जाहीर करा किंवा संमेलनानंतर झालेच पाहिजे. त्या अनुषंगाने मराठी भाषा का होऊ नये म्हणून आम्ही शेवटच्या दिवशी एक अभिरूप न्यायालय कार्यक्रम सादर केला होता व तशी अपेक्षा व्यक्त केली होती. यानंतर देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख वक्ते ॲड. आशिष जाधवर यांनी भारतीय संविधान आणि आंबेडकर कलमांचा अभ्यास सांगितला. जेथे वेदांची गरज होती ते काम व्यासांनी केले. संविधानाची गरज होती ते काम बाबासाहेबांनी केले. बाबासाहेब क्रांतिकारक ठरले. त्यांचे नावातच माय आहे. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून विद्वत्ता मिळवली. आपला तिरस्कार होत असूनही कधी विरोध केला नाही. बाबासाहेब यांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. महिला आणि कामगार हक्काचे समर्थन केले. भारतमातेच्या स्वातंत्र्याच काय होईल..? पुन्हा पारतंत्र्यात जाईल की काय ही चिंता त्यांना होती. इथल्याच गद्दारांमुळे देश पारतंत्र्यात गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातदेखील ही फितुरी त्यांच्यातीलच गद्दारांनी केली होती हे इतिहास सांगतो.
डॉ. राजेंद्र प्रसाद बिहार प्रांतातून संविधान सभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. जिथे त्यांनी १९४६ ते १९५० या काळात संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. या काळात ते चार समित्यांचे अध्यक्ष होते. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या भूमिकेतील वस्तुनिष्ठता, निःपक्षपातीपणा, संयम आणि बुद्धी या गुणांसाठी त्यांचे नेहमीच कौतुक होत असे. संविधानावर राजेंद्र प्रसाद यांचे १० डिसेंबर १९४६ ला पहिले भाषण झाले. मुस्लिम सभेत रिकाम्या खुर्च्या बघून त्यांनी खंत व्यक्त केली व आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. त्याचवेळी धर्माच्या आधारावर फाळणीचा मुद्दा आला. बाबासाहेब ना प्रश्न पडला.. १४ आगष्टला फाळणी झाली. १९४७ मधील भारताची फाळणी म्हणजे राजकीय सीमा बदलणे आणि इतर मालमत्तेचे विभाजन जे भारतीय उपखंडातील ब्रिटिश राजाचे विघटन आणि दक्षिण आशियामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र वर्चस्वाची निर्मिती होते . भारताचे अधिराज्य आज भारताचे प्रजासत्ताक आहे आणि पाकिस्तानचे अधिराज्य – ज्यात त्या वेळी भारताच्या दोन्ही बाजूला असलेले दोन प्रदेश होते – आता इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेश आहे . भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७ मध्ये विभाजनाची रूपरेषा मांडण्यात आली होती. राजकीय सीमा बदलण्यात विशेषत: ब्रिटिश भारतातील बंगाल आणि पंजाब या दोन प्रांतांच्या विभाजनाचा समावेश होता. या प्रांतातील बहुसंख्य मुस्लिम जिल्हे पाकिस्तानला आणि बहुसंख्य बिगर मुस्लिम जिल्हे भारताला देण्यात आले.

बाबासाहेबांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, अखंड भारत हा मुस्लिमांच्या सुद्धा हिताचा असेल हे १७ डिसेंबर ४६ ला बाबासाहेबांनी सांगितलं होतं. भारताशी तुलना करताना विभागण्याची कल्पना आवडत नाही. पूर्ण भारताचा विचार करुन सक्षम केंद्र बनवणं आवडतं. १४ ऑगस्ट ला फाळणी झाली तेव्हा बाबासाहेब बाहेर पडले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पत्र पाठवून पुन्हा बाबासाहेबांना बोलवलं. देशाचं नागरिकत्व कोणाला द्यायचे हा संसदेला अधिकार दिला मुलभूत अधिकारांमध्ये अस्पृश्य निर्मुलन, मतदानाचा समान अधिकार, ३७० कलम आदी विषयांवर प्रकाश टाकला. स्वतः प्रकाश बना (आत्म दिपो भव..) या बुध्दांच्या शिकवण नुसार धोके ओळखून संविधान लिहून काढले. मात्र कालांतराने फक्त राष्ट्रपती च्या संमतीने आर्टिकल ३५ अ संविधानात दुरुस्ती करुन घुसविले. भारताचे संविधान जम्मू काश्मीर ला लागू असूनही स्वतंत्र संविधानाचा अधिकार दिला. समान नागरी कायदा आर्टिकल ४४ मधील फौजदारी कायदे समान तर सिव्हिल कायदे का नको. कम्युनिस्ट व समाजवादी पक्षाने संविधानाला दुषणे दिली. तिरस्कार केला कारण त्यांना हुकूमशाही चं तत्व असणारं संविधान पाहिजे होतं. समाजवादी पक्षाला मोकळीक (फ्रीडम) व मुलभूत अधिकारावर कुठलीही मर्यादा नको होती. सत्तेत आलो नाही तर सर्व संस्था उखडून फेकून द्याव्यात अशी त्यांची अपेक्षा होती. भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांचे राजकारण होते असेही स्पष्ट केले. कम्युनिस्ट व समाजवादी पक्षाने संविधानाला दुषणे दिली. तिरस्कार केला कारण त्यांना हुकूमशाही चं तत्व असणारं संविधान पाहिजे होतं. समाजवादी पक्षाला मोकळीक (फ्रीडम) व मुलभूत अधिकारावर कुठलीही मर्यादा नको होती. सत्तेत आलो नाही तर सर्व संस्था उखडून फेकून द्याव्यात अशी त्यांची अपेक्षा होती. संविधान सभेच्या शेवटच्या अधिवेशनात २४ जानेवारी १९५० रोजी डॉ राजेंद्र प्रसाद यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आणि दुसऱ्यांदा पुन्हा निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री देशाचा कारभार व्यवस्थित व्हावा यासाठी  बाबासाहेबांनी संविधानासाठीचे क्रेडीट सर्व कमिटीला दिलं यावरुन त्यांचे विशाल हृदयाची कल्पना येते. संविधानाचा प्रवास कसा असावा ? हे ठरविले त्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकर ‘भारतरत्न’ ठरले होते.

ॲड. श्रावण ब्रम्हे, प्रा. विजय तुंटे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्या भारत देशात विविध धर्माचे, जातीचे वर्णाचे लोक राहतात. प्रत्येक धर्मात गुरुंना महत्व दिले जाते. घटनेचे एका तासात आपण विश्लेषण करु शकत नाही. सर्वांना मुलभूत हक्क देण्यासाठी संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अजरामर राहील. शासन आणि जनता यातला सुसंवाद म्हणजे संविधान होय. भारतीय संविधान सातत्याने सर्व नागरिकांनी वाचलं पाहिजे. जनमानसांचं प्रतिबिंब झालं पाहिजे. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, सोमनाथ ब्रम्हे, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शिला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंग लाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र निकुंभ, प्रा. शीला पाटील यांनी तर आभार प्रा. शीला पाटील यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!