गडखांब येथील मधुरबाई सुभाष पाटील यांचे निधन

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : तालुक्यातील गडखांब येथील रहिवासी सुभाष लाला पाटील यांच्या धर्मपत्नी स्व. मधुरबाई सुभाष पाटील यांचे काल रविवार दिनांक ८ मार्च रोजी रात्री ११.४५ वाजता अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांना औषधोपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सूना, मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. गडखांब चे प्रगतशील शेतकरी दिनेश सुभाष पाटील व पोलीस पाटील प्रदीप सुभाष पाटील यांच्या त्या मातोश्री होत. उद्या सोमवार दिनांक दुपारी १ वाजता राहत्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!